हे तर जनतेला लुटणारे सरकार
फक्त एकदाच वाचा आणि मग ठरवा
बरोबर कि चूक
दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी नाडण ता. देवगड सिंधुदुर्ग ४१६८०५ येथील ग्रामपंचायत मध्ये महा विद्युत वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर स्मार्ट एनर्जी मीटर संबंधात ग्राम सभा झाली , त्यातून निघालेले हे प्रश्न ........
१) स्मार्ट मीटर बदलण्याची सक्ती सरकार करते आहे का ?
२ ) एखाद्या ग्राहकाने पूर्वी जसा बाजारातून खरेदी केलेला मीटर बसविण्याची MSEB परवानगी देत होती तशी स्मार्ट मीटर बदलण्याची ग्राहकाला परवानगी आहे का ?
आणि सर्वात महत्वाचा .......
३) स्मार्ट मीटर reading बरोबर करते आहे किंवा नाही याची चाचणी घेण्याची यंत्रणा MSEB कडे आहे का ?
नसल्यास ती ग्राहकाला चाचणी देणे MSEB ला बंधन कारक आहे ., आणि ती चाचणी सुद्धा मीटरच्याच जाग्यावर ! .
४) लोकांना स्मार्ट मीटरचे अमिश दाखवून किंवा ग्राहकांच्या नकळत ज्यांची मीटर बदललेली आहेत त्यांची पूर्वीची चालू मीटर MSEB मंडळाने पुन्हा जोडून देणे.
MSEB महा विद्युत वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे
१) स्मार्ट मीटर बसवण्याची कोणतीही सक्त्ती सरकार करीत नाही ! .........to be noted
2) बाजारातून खरेदी करून स्मार्ट मीटर बसवण्याची परवानगी MSEB देत नाही .........to be noted
३) ग्राहकाला मीटर चाचणी करून देण्याची कुठलीही यंत्रणा MSEB कडे नाही . .........to be noted
४) ग्राहकांच्या नकळत ज्यांची मीटर बदललेली आहेत त्यांची पूर्वीची चालू मीटर MSEB मंडळाने पुन्हा जोडून द्यावीत याबद्दल कोणतेही उत्तर द्यावयास अधिकारी तयार नाहीत ., ग्रामसभेचातसा ठराव झाल्याचे पत्र आम्हास द्यावे लागेल .तर विचार करू
आता उत्तरांचा आपण परामर्श घेऊया
१) कोणतीही सक्त्ती नसतांना सुद्धा केवळ सरकारी ताकदीच्या जोरावर मीटर बदलली गेली
हि हुकूमशाही झाली ......
२) बाजारात खरेदी करून मीटर बसवायला MSEB परवानगी देत नाही याचाच अर्थ आम्ही देऊ तीच मीटर तुम्ही बदलायची आहेत कोणतीही चाचणी न देता
हि हुकूमशाही झाली ......
३) ग्राहकाला मीटर चाचणी करून देण्याची कुठलीही यंत्रणा MSEB कडे नाही कदाचित जास्त रिडींग घेईल अशी मीटर बसवणे सरकारला सहज शक्य आहे
हि हुकूमशाही च झाली ......
४) सक्त्ती नसतांना सुद्धा ग्राहकांच्या नकळत मीटर बदललेली पूर्वीची मीटर बसवून देणे याचा नकार देणे , नको ती कारणे सांगणे याचाच अर्थ
हि हुकूमशाही नाहीतर काय आहे .
सुज्ञास आणखी सांगणे न लगे !
........ क्षितिज बातम्या
नाडण , देवगड
माजी विद्यार्थी ग्राम विकास मंडळ - नाडण , देवगड ,सिंधुदुर्ग ४ १ ६ ८ ० ५
दिनांक ७ ऑक्टोबर २ ० २ ५ रोजी माजी विद्यार्थी ग्राम विकास मंडळ - नाडण यांची सर्वसाधारण सभा झाली .
श्री अतुल वेलणकर , श्री नितीन वारिक , श्री सतीश भिडे , श्री मोहन वेलणकर , श्री वैभव मराठे . श्री रोहन कांबळे , अध्यक्ष श्री प्रकाश मिराशी , विजय वारिक मंडळाचे पदाधिकारी ,
आणि सदस्य उपस्थित होते. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .महत्वाचे काही ठराव करण्यात आले
१ ) नाडण येथे असलेल्या प्राथमिक शाळा क्रमांक १ या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्ती साठी मंडळातील काही सदस्यांनी
वाडीवर जाऊन लोकांना विश्वासात घेऊन निधी संकलना साठी आवाहन करणे
२ ) जिल्हा परिषद चालवत असलेल्या शाळांच्या इमारतीच्या देखभाली साठी प्रत्येक
गावातल्या माजी विद्यार्थी मंडळांनी पुढाकार घेऊन इमारतीची देखभाल पाहावी असा शासननाने GR काढल्याची माहिती द्यावी
३ ) तसेच माजी विद्यार्थी ग्राम विकास मंडळ - नाडण करत असलेले कार्य प्रत्येक ग्रामस्थाला कळावे या उद्देशाने मोबाइल ग्रुप तयार करण्यात यावा
४ ) गावात असलेल्या आणि शाळेच्या देखभाली साठी कार्यरत असलेल्या इतर मंडळांनी / समितींनी त्यांच्या परीने त्यांचे काम चालूच ठेवावे ,
कुठूनही शाळेच्या इमारतीची डागडुजी व्हावी इतकीच माजी विद्यार्थी ग्राम विकास मंडळ - नाडण यांची इच्छा आहे.
उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे
आभार मानून हि सभा संपली असे मंडळाच्या अध्यक्षांनी घोषित केले आणि सभेची आनंदाने सांगता झाली
देवगड सिंधुदुर्ग येथील नाडण या गावातील घाडी वाडीत " हर घर में पानी " हि योजना मंजूर केली. सिमेंट ची टाकी बांधण्यात आली पायपिंग करून नळ बसवले गेले. आज दोनतीन वर्ष झाली पण त्या टाकीत अजून पाणीच भरलं गेलं नाही . स्थानिक कार्यकर्त्यांना विचारलं , नेत्यांना विचारलं , एकच उत्तर कंत्राटदार ( कॉन्ट्रॅक्टर ) काम पूर्ण करीत नाही . बरोबर कंत्राटदार काम पूर्ण कसा करेल ? आपापल्या वाटणी नुसार सर्वांनी रक्कम वाटून घेतली विषय संपला . आता कोणीच त्याकडे लक्ष देत नाही . आत्ता तात्पुरती जनतेच्या समाधानासाठी छोटीशी टाकी दिसते आहे . पण किती लोकांना पाणी पुरणार ? आणि त्या योजनेवर खर्च केला आहे तो जनतेच्या घामाचाच पैसा ना ?
या गोष्टीला जनताही तितकीच जबाबदार आहे .निवडणुकीच्या वेळेला नेते कार्यकर्ते प्रत्येकाच्या दाराशी जातात त्यावेळी जनतेची तोंड बंद , एकत्र येऊन त्यांना जाब विचारावा असे कुणाला वाटत नाही. कारण प्रत्येकाचा वैयक्तिक स्वार्थ , आज मला पैसे मिळता आहेत ना ! बस झाले उद्याचे कोणी बघितले आहे . पण उद्या जेव्हा उजाडतो तेव्हा जनता जागी होते , आपण पैसे घेतले खरे पण आपल्या घरात पाणीच नाही . हि जाणीव आता होऊन काय उपयोग ? जनतेला संधी परत परत मिळत असते , नेमेचि येतो पावसाळा या उक्त्ती प्रमाणे येरे माझ्या मागल्या .